स्मृतीशेष प्रदिपदादा निमकाळे व स्मृतीशेष ऋषिकेश वाघमारे स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
स्मृतीशेष प्रदिपदादा निमकाळे व स्मृतीशेष ऋषिकेश वाघमारे स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद अंजनगांव सुर्जी ता. यश अहेर प्रोडक्शन तालुक्यातील सातेगाव येथे लोकसेवक स्मृतीशेष प्रदिपभाऊ निमकाळे आणि पत्रकार स्व.ऋषीकेश वाघमारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित रक्तदान शिबिरामध्ये आज दि. ६ ला ९१ रक्तदात्यांनी रक्तदान करुन श्रध्दांजली अर्पण केली. अंजनगांव सुर्जी तालूक्यातील चालते फिरते कार्यालय असलेल्या प्रदिपदादा निमकाळे यांचा ३ मे ला ह्दय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.स्व.प्रदिप निमकाळे यांनी तालुक्यामध्ये शेकडो रक्तदान शिबीरे आयोजीत केली होती.त्यामुळे त्यांना रक्तदान करुनच श्रध्दांजली अर्पण करण्याचा माणस कार्यकर्त्यानी आज पुर्ण केला. सातेगाव येथे संत गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात झालेल्या या रक्तदान शिबीराला सातेगाव येथील नागरिकासह तालुक्यातील रक्तदात्यांनी रक्तदान करुन प्रदिपभाऊ निमकाळे आणि ऋषीकेश वाघमारे यांना श्रध्दांजली अर्पण केली.विषेशा म्हणजे रक्तदान शिबीराला महीलावर्गाने सूद्धा ऊस्फुर्त प्रतीसाद दिला.यावेळी तालुक्यातील मान्यवर...