मातृछाया कोविड सेंटरवर सोशल मिडीयाच्या माध्यमातून लावलेले आरोप बिनबुडाचे :-डॉ. कौस्तुभ पाटील
अंजनगाव सुर्जी
यश अहेर प्रोडक्शन
मातृछाया कोविड सेंटर हे निरंतर रुग्णाची सेवा आणि आरोग्याची काळजी घेत असून काही दिवसाअगोदर सोशल मिडीयाच्या माध्यमातून सेंटरवर लावलेले आरोप बिनबुडाचे असून लावलेल्या आरोपांना कोणताही आधार नसल्याचे भंडारज येथिल मातृछाया कोव्हिड सेंटरचे संचालक डाँ.कौस्तूभ पाटील यांनी आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
![]() |
कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पहाता अंजनगांव सुर्जी तालूक्यातही कोव्हिड सेंटर असावे यासाठी मातृछाया वेलफेअर सोसायटीच्या सहकार्याने भंडारज येथे दोन व्हेन्टीलेटर बेड सह ४० खाटांचे कोव्हिड केअर सेंटर शासनाच्या नियमाप्रमाणे उघडण्यात आले.एक महिण्यापासून आतापर्यंत १४० रुग्ण केअर सेंटर मध्ये भर्ती झाले.तर दोन रुग्ण उपचारादरम्यान दगावले.ज्याचे आम्हालाही दुःख आहे.सेंटरमध्येच रुग्णाच्या रक्ततपासणी सह ईतरही व्यवस्था होते.फक्त ज्या तपासण्या अंजनगांव तालूक्यामध्ये उपलब्ध नाही त्या आम्ही बाहेरुन करवून घेतो.रुग्णाना आकरण्यात येत असलेली फी शासकीय दरपत्रकाप्रमाणेच असून कुणाला काही शंका असल्यास शासकीय आॕडीटर मार्फत कोविड सेंटरचे आॕडीट करु शकता.जर काही चूका झाल्या असतील तर मला जी सजा होईल ती भोगायला मी तयार असल्याचे,डाँ.कौस्तूभ पाटील यांनी सांगीतले.
एक महीण्यापुर्वि सुरु झालेल्या भंडारज येथिल कोविड सेंटरबाबत काही दिवसापासून उलटसुलट चर्चेला पेव फूटले होते.मातृछाया कोवविड सेंटर मध्ये रुग्ण दगावतात,आॕक्सीजन वेळेवर मिळत नाही,पैशाची आकारणी अवास्तव केल्याजाते,रुग्णाची योग्य सोय होत नाही,भंडारज येथे कोविड सेंटरमुळे रुग्णाची संख्या वाढली असे अनेक प्रकारचे आरोप सोशल मिडीयावर होत असतांना आज दि.३० ला पत्रकार परिषदेचे आयोजन करुन लावलेल्या आरोपाचे खंडन मातृछाया वेलफेअर सोसायटी आणि कोविड सेंटर तर्फे करण्यात आले.यावेळी पत्रकारपरिषदेला डाँ.कौस्तूभ पाटील,डाँ.युवराज पाटील,डाँ.राहूल दाभाडे,डाँ,शाम नेमाडे,सिस्टर जाॕयसी कोरित,डाँ.सोहम पवार,डाँ.शुभम भरणे.सह मातृछाया कोविड सेंटर मधिल इतरही डाँ.उपस्थित होते.
यावेळी सत्यम पॕथाॕलाॕजी चे डाँ.शाम नेमाडे यांनी रुग्णाच्या तपासणी फी बाबत आणि दोन ठीकाणी असलेल्या पॕथाॕलाॕजीबद्दल बोलतांना सांगीतले की निययामानूसारच फी आकारली जात असून शासनाच्या नियमानूसारच अकोट आणि अंजनगांव ला लॕब असल्याचे सांगुन कुणाकडुन चुकुन जास्त फी आकारली गेली असल्यास ती परत करण्यात येतिल असे सांगितले.
Comments
Post a Comment