Skip to main content

Posts

Showing posts from June, 2021

स्मृतीशेष प्रदिपदादा निमकाळे व स्मृतीशेष ऋषिकेश वाघमारे स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

  स्मृतीशेष प्रदिपदादा निमकाळे व स्मृतीशेष ऋषिकेश वाघमारे स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद अंजनगांव सुर्जी ता.  यश अहेर प्रोडक्शन   तालुक्यातील सातेगाव येथे लोकसेवक स्मृतीशेष प्रदिपभाऊ निमकाळे आणि पत्रकार स्व.ऋषीकेश वाघमारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित रक्तदान शिबिरामध्ये आज दि. ६ ला ९१ रक्तदात्यांनी रक्तदान करुन श्रध्दांजली अर्पण केली. अंजनगांव सुर्जी तालूक्यातील चालते फिरते कार्यालय असलेल्या प्रदिपदादा निमकाळे यांचा ३ मे ला ह्दय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.स्व.प्रदिप निमकाळे  यांनी तालुक्यामध्ये शेकडो रक्तदान शिबीरे आयोजीत केली होती.त्यामुळे त्यांना रक्तदान करुनच श्रध्दांजली अर्पण करण्याचा माणस कार्यकर्त्यानी आज पुर्ण केला. सातेगाव येथे संत गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात  झालेल्या या रक्तदान शिबीराला सातेगाव येथील नागरिकासह तालुक्यातील रक्तदात्यांनी रक्तदान करुन प्रदिपभाऊ निमकाळे आणि ऋषीकेश वाघमारे यांना श्रध्दांजली अर्पण केली.विषेशा म्हणजे रक्तदान शिबीराला महीलावर्गाने सूद्धा ऊस्फुर्त प्रतीसाद दिला.यावेळी तालुक्यातील मान्यवर...

शहीद जवान गजानन राऊत अंजनगाव सुर्जी अमरावती

 शहीद जवान गजानन राऊत अंजनगाव सुर्जी अमरावती | Shahid Fauji Gajanan Raut Anjnagaon Surji  अंजनगाव सुर्जी  यश  अहेर प्रोडक्शन  Gajanan Namdevrao Raut. 43 BN BSF रा अंजनगाव  सुरजी चे जवान काल दि 30 में 2021 ला शाहिद झाले. भारतीय सैनिकांच्या शौर्याची गाथा खरंतर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कोरली जायला हवी अशी आहे. अभूतपूर्व साहस, जाज्ज्वल्य देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, नि:सीम धैर्य आणि कठोर निर्धार यांच्या बळावर एकीकडे अपुरा शस्त्रसाठा, प्रतिकूल निसर्ग आणि दुसरीकडे अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असताना त्यांवर मात करत, आपल्या जिवाची तमा न बाळगता शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणारे भारतीय सेनेचेे वीर जवान! पण कित्येकांना या अशा विपरीत परीस्थीतीत विविध व्याधींना सुध्दा सामोरे जावे लागते.अंजनगांवचे सुपुत्र गजानन भाऊ राऊत यांना सुध्दा कर्तव्यावर असताना असेच वीरमरण आले म्हणावे लागेल.गजाननभाऊंना मी माझ्या परीवारातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो.         विडीयो बघावा✍️