मातृछाया कोविड सेंटरवर सोशल मिडीयाच्या माध्यमातून लावलेले आरोप बिनबुडाचे :-डॉ. कौस्तुभ पाटील अंजनगाव सुर्जी यश अहेर प्रोडक्शन मातृछाया कोविड सेंटर हे निरंतर रुग्णाची सेवा आणि आरोग्याची काळजी घेत असून काही दिवसाअगोदर सोशल मिडीयाच्या माध्यमातून सेंटरवर लावलेले आरोप बिनबुडाचे असून लावलेल्या आरोपांना कोणताही आधार नसल्याचे भंडारज येथिल मातृछाया कोव्हिड सेंटरचे संचालक डाँ.कौस्तूभ पाटील यांनी आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पहाता अंजनगांव सुर्जी तालूक्यातही कोव्हिड सेंटर असावे यासाठी मातृछाया वेलफेअर सोसायटीच्या सहकार्याने भंडारज येथे दोन व्हेन्टीलेटर बेड सह ४० खाटांचे कोव्हिड केअर सेंटर शासनाच्या नियमाप्रमाणे उघडण्यात आले.एक महिण्यापासून आतापर्यंत १४० रुग्ण केअर सेंटर मध्ये भर्ती झाले.तर दोन रुग्ण उपचारादरम्यान दगावले.ज्याचे आम्हालाही दुःख आहे.सेंटरमध्येच रुग्णाच्या रक्ततपासणी सह ईतरही व्यवस्था होते.फक्त ज्या तपासण्या अंजनगांव तालूक्यामध्ये उपलब्ध नाही त्या आम्ही बाहेरुन करवून घेतो.रुग्णाना आकरण्यात येत असलेली फी शासकीय...
न्यूज़ एंड विडीओ फ़ैक्टरी This Blog is Running By YASH AHER PRODUCTION News, Videos, Vlogs, Articles, धन्यवाद ✍️